पोषण आहाराबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही : मनीषा बोर्डे

अकोला (Akola).  पोषण आहाराविषयी गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा बोर्डे यांनी दिला. गुरुवार रोजी झालेल्या समितीच्या सभेत त्या बोलत होत्या.

टी.एच.आर. अंतर्गत प्राप्त होणा-या पोषण आहार संदर्भात अकोट तालुक्यातील प्राप्त तक्रारीवर आपण तसेच अकोट पंचायत समिती सभापती लता नितोने यांनी धामणगाव चोरे, चंडिकापूर, सावरा अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्या असता बंधित पुरवठा यंत्रणेकडून निकृष्ट दर्जाचा काळा हरभरा पुरवठा करण्यात आला आणि मिरची व हळदीचा पुरवठा झालाच नाही, असे आढळले. यापुढे असे होऊ नये या बाबत सतर्कता बाळगण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

पोषण आहाराचा पुरवठा करताना संबंधित सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्यांना माहिती देऊन पोषण आहाराच्या वितरणाच्या वेळी उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले. समिती सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे यांनी सभेचे कामकाज पाहिले. सभेला गायत्री कांबे, योगिता रोकडे, रिजवाना परवीन शे.मुक्तार, मीनाक्षी उन्हाळे, लता नितोने, वंदना झळके, उर्मिला डाबेराव,अनुसया राऊत ह्या सदस्य उपस्थित होत्या.