आमदार श्रीकांत देशपांडे
आमदार श्रीकांत देशपांडे

कुठलीही परवानगी न घेता, शहरातील एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आ. श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • विना परवानगी सभा घेणे भोवले

अकोला (Akola). कुठलीही परवानगी न घेता, शहरातील एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आ. श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत उभे असलेल्या आ. श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये निवडणूक संदर्भात बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असताना सुध्दा प्रचार बैठकीचे आयोजन केले. यामुळे त्यांच्यावर कलम २६९, २७०, १८८ भादंवीसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २,३,४ अन्वये रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.