मोबाईलचा अतिवापर जीवावर बेतू शकतो; झोपेवर परिणाम, अपघातात वाढ

समाजात सध्या मोबाईलचा उपयोगापेक्षा दुरुपयोग अधिक होताना दिसत आहे. समाजातील वृद्ध, युवक, युवती, लहान मुले मोबाईलवर अवलंबून असलेले दिसतात.

    अकोला (Akola).  समाजात सध्या मोबाईलचा उपयोगापेक्षा दुरुपयोग अधिक होताना दिसत आहे. समाजातील वृद्ध, युवक, युवती, लहान मुले मोबाईलवर अवलंबून असलेले दिसतात. मोबाईलचा अतिवापर मानसिक स्वास्थ्य नष्ट कvidarरणारा तसेच जीवावर बेतणारा ठरू शकतो. याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन विविध क्षेत्रांतील मान्यवर करीत आहेत.

    मोबाईलवर सारखे बोलणाऱ्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. तसेच वाहन चालवताना कानांना इयर फोन लावून मोटारसायकल चालविण्याची फॅशन झाली आहे. काही बहाद्दर तर वाहन चालवताना क्रमांक डायल करतात. समोरुन कोण येत आहे याचे भानही त्यांना नसते, यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.

    स्थानिक ई and टी स्पेशालिस्ट डॉ. किरण लड्ढा यांनी, मोबाईलचा अधिक वापर करणाऱ्यांच्या स्वभावात फरक जाणवतो हे मान्य केले. चिडचिड वाढलेली दिसते. मोबाईलचा वापर आवश्यक कामांसाठी झाल्यास दुष्परिणाम दिसणार नाहीत. त्यामुळे मोबाईलवर खूप वेळ बोलणे टाळावे. कारण त्यामुळे व्याधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. — डॉ. किरण लड्ढा

    स्थानिक न्यूरॉलॉजिस्ट डॉ. नितीन विरवानी म्हणाले, येणाऱ्या काळात मोबाईलचे व्यसन जडलेले समाजात दिसेल. ज्यामुळे घराघरात अशांतता, भांडणे वाढू शकतात. वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्सअप, फेसबुकवर मेसेज टाकत राहिल्यास झोपेवर परिणाम होतो. मोबाईलवर सारखे बोलल्यास स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता राहते. अंधारात मोबाईलच्या प्रकाशामुळे माइग्रेन होऊ शकतो. मोबाईलमुळे नात्यांचे महत्त्व कमी होत आहे. आधी एका पोस्टकार्डवर भावना व्यक्त होत होत्या, परंतु आता मोबाईलचा वापर केला जातो. त्यामुळे स्नेहबंधात दरी दिसू लागली आहे. — डॉ.नितीन विरवानी

    एसए महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख तथा मोबाईल विशेषज्ञ डॉ. सुरेशकुमार केसवानी म्हणाले, अशातच झालेल्या संशोधनाने हे स्पष्ट झाले की, इयर फोनच्या दररोज दोन तासाच्या वापरामुळे हळूहळू बहिरेपणा येऊ शकतो. अशा Mobile App उपलब्ध आहेत ज्यातून Applicationची वेळ सांगितली जाते. त्याचा वापर केल्यास आपण किती वेळ मोबाईलचा उपयोग केला हे कळू शकते. मोबाईलच्या अधिक वापराने मानसिक अस्वस्थता, कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, झोपेची समस्या होऊ शकते. सुरक्षित डेसिबलपेक्षा अधिक आवाज ठेवल्यास स्थिती भयानक होण्याची शक्यता असते. तंत्रज्ञानाशिवाय जगणे कठीण असले तरी त्याचा योग्यप्रकारे वापर करण्यातच चातुर्य आहे. तसेच योग्य वापर करावा याविषयी गुगलवर उपयुक्त माहिती मिळू शकते, असेही ते म्हणाले. — डॉ. सुरेशकुमार केसवानी