प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महावितरणचे येथील उप कार्यकारी अभियंता सचिन कोहाळ यांना निलंबित करण्यात आले. 22 जून 2015 पासून ते येथे कार्यरत असल्यापासून वीज ग्राहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक तसेच त्यांच्या विषयीच्या सतत तक्रारी राहिल्या आहेत.

    तेल्हारा (Telhara).  महावितरणचे येथील उप कार्यकारी अभियंता सचिन कोहाळ यांना निलंबित करण्यात आले. 22 जून 2015 पासून ते येथे कार्यरत असल्यापासून वीज ग्राहक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक तसेच त्यांच्या विषयीच्या सतत तक्रारी राहिल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी वीजसमस्या सोडवण्यासाठी त्यांना फोनवर विचारणा केली असता त्यांनी आमदारांचा फोन उचलला नव्हता. तसेच परत फोन सुद्धा केला नाही.

    कोरोनामुळे गेल्या वर्षापासून विजेची देयके कोटीच्या घरात थकीत असूनही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. आदी कारणांमुळे त्यांना सेवेतून निलंबित केल्याचा आदेश अधीक्षक अभियंता अकोला यांच्या स्वाक्षरीने कार्यकारी अभियंता अकोट यांच्यामार्फत पाठविण्यात आला.