अकोला मनपा आयुक्त संजय कापडणीस
अकोला मनपा आयुक्त संजय कापडणीस

अकोला (Akola):  मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपा मुख्य कार्यालयातील विविध विभागांची बुधवारी झाडाझडती घेतली. यावेळी गैरहजर असलेल्या १४७ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले.

  • लेट लतीफ १४७ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात

अकोला (Akola):  मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपा मुख्य कार्यालयातील विविध विभागांची बुधवारी झाडाझडती घेतली. यावेळी गैरहजर असलेल्या १४७ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले.

मनपामधील कर्मचारी सकाळी वेळेनुसार कामावर हजर होत नाहीत, महत्वाच्या कामांसाठी येणारे नागरिक त्यामुळे ताटकळत बसतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बुधवारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयांची तसेच पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत तपासणी केली. यावेळी 147 कर्मचारी गैरहजर आढळून आले. ही बाब कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने शिस्तीस अनुसरून नसून कर्तव्यात कसूर करणारी आहे. त्यामुळे या गैरहजर कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यापासून, शासकीय कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी सामान्य प्रशासन विभागातील 9, बाजार परवाना विभागातील 14, माहिती अधिकार कक्षातील 4, विद्युत विभागातील 7, शिक्षण, पूर्वझोन आणि पश्चिम झोन कार्यालयातील प्रत्येकी 3, उत्तर झोन कार्यालयातील 14, दक्षिण झोन कार्यालयातील 5, आरोग्य (स्वच्छता) विभागातील 10, निवडणूक विभागातील 1, संगणक विभागातील 6, भांडार विभागातील 2, जन्म मृत्यू नोंदणी विभागातील 4, नगरसचिव विभागातील 15, जलप्रदाय विभागातील 11, कर वसुली विभागातील 6, नगररचना विभागातील 10, महिला व बाल कल्याण विभागातील 1, लेखा विभागातील 7 असे एकूण 147 कर्मचारी सकाळी गैरहजर आढळल्याने या कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. यावेळी मनपा आयुक्त यांनी कार्यालयात उशिरा येणा-या तसेच पूर्वपरवनगी न घेता गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. याचप्रमाणे मनपातील प्रत्येक कर्मचारी यांनी दैनंदिन केलेल्या कामांची नोंदवही (वर्क रजिस्टर) ठेवणे बंधनकारक आहे, अशा सुचनाही दिल्या.