हत्येतील आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी; पातूर न्यायालयाचा आदेश

पातूर तालुक्यातील ग्राम कापशी येथे बंटी केवट या युवकाची नातेवाईकांनीच हत्या केल्याप्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवार, 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

    पातूर (Patur).  ग्राम कापशी येथे बंटी केवट या युवकाची नातेवाईकांनीच हत्या केल्याप्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवार, 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

    राष्ट्रीय महामार्गामध्ये गेलेल्या शेतीच्या दोन कोटी 40 लाख रुपयांच्या वादातून चुलत भाऊ आणि काकूने बंटी केवट याची 17 मार्च रोजी हत्या केली होती. 18 रोजी पोलिसांनी विशाल मुन्नीलाल केवट व चौफुला मुन्नीलाल केवट यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 19 मार्च रोजी दोघांना पातूर न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने 20 मार्चपर्यंत एका दिवसाचा पीसीआर दिला आहे.