मास्क न लावणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करताना पोलीस
मास्क न लावणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करताना पोलीस

  • वाहतूक शाखेची धडक मोहीम

अकोला (Akola).  कोरोनाला पायबंद घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी ऑटोचालकांसाठी नो मास्क नो सवारी मोहीम सुरू केली आहे. नियमाचा भंग करणाऱ्या २००ऑटोचालकांना दंड करुन त्यांना ताकीद देण्यात आली आहे.

ऑटोचालकांनी स्वतः मास्क लावावा तसेच प्रवाशांना मास्कशिवाय ऑटोत बसवू नये अशी ताकीद देण्यात आली आहे. तरी सुद्धा काही ऑटोचालक बंधन पाळत नसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. शहरातील ऑटोरिक्षांवर नो मास्क नो सवारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, असे लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. २८ रोजी पोलिस निरीक्षक गजानन शेळके सहका-यांसह रस्त्यावर उतरले आणि निर्देश न पाळणा-या ऑटो चालकांवर कारवाई केली. गांधी चौक, सिटी कोतवाली, टॉवर चौक, धिंग्रा चौक या गजबजलेल्या चौकात वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. चालकांनी कोरोना पासून बचावासाठी मोहिमेचे महत्व लक्षात घ्यावे,असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.