प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देशी दारू विक्री करणारा भिकनबुद्धू नवरंगाबादी (52) रा. फरीदनगर नायगाव अकोट फैल याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हातभट्टीची दारू तयार करणे, तसेच विनापरवाना दारूविक्री करण्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

    अकोला (Akola)  देशी दारू विक्री करणारा भिकनबुद्धू नवरंगाबादी (52) रा. फरीदनगर नायगाव अकोट फैल याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. हातभट्टीची दारू तयार करणे, तसेच विनापरवाना दारूविक्री करण्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती; परंतु त्याचा काहीही परिणाम न झाल्याने त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

    पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, एसडीपीओ सचिन कदम, एलसीबीचे शैलेश सपकाळ, मंगेश महल्ले, अकोट फाईलचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी केली. जुलै 2020 पासून आजपर्यंत 15 गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झाली आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुस्क्या आवळल्या जात आहेत.