अंगणवाड्यांची पाहणी करताना अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार
अंगणवाड्यांची पाहणी करताना अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार

अकोला (Akola). अंगणवाड्यांतून पोषण आहार कशाप्रकारे दिला जात आहे. तसेच नव्याने झालेले बांधकाम कशाप्रकारचे आहे. या विषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी पाहणी केली. संबंधिताना सूचना देऊन कामामध्ये दिरंगाई होऊ देऊ नका, असे निर्देश दिले.

मलकापूर, कान्हेरी सरप, राजंदा, शिंदखेड मोरेश्वर, आणि पातूर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील अंगणवाड्यांची पाहणी केली. अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीचे काम चालू आहे याची पाहणी केली. जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाड्यांसाठी बांधकामासाठी निधी मिळाला आहे. बांधकामाच्या प्रगतीची पाहणी करुन राहिलेल्या कामाला गती द्या, काम दर्जेदार करा, असे निर्देश देखील कटियार यांनी दिले. पोषण आहाराबाबत लाभार्थ्यांशी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी संवाद साधला.

अंगणवाड्यामधून पुरवण्यात येणा-या सेवा परिणामकारकरित्या देण्या संदर्भात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मार्गदर्शन केले. सीईओ समवेत महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे,संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक, सरपंच तसेच लाभार्थी उपस्थित होते.