प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अकोला (Akola) जिल्ह्यात आजवर २३ म्युकर मायकोसिसचे (mucosal mycosis) रुग्ण आढळले आहेत. १२ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) शस्त्रक्रिया करण्यात (underwent surgery) आली. यातील सहा रुग्ण बरे होऊन गेले. सध्या आठ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    अकोला (Akola).  जिल्ह्यात आजवर २३ म्युकर मायकोसिसचे (mucosal mycosis) रुग्ण आढळले आहेत. १२ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) शस्त्रक्रिया करण्यात (underwent surgery) आली. यातील सहा रुग्ण बरे होऊन गेले. सध्या आठ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये पाठविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात (in Chandrapur district) ५४ रुग्ण आढळले.

    यापैकी ३३ रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया झाल्‍या असून एकाचा मृत्‍यू झाला आहे. वर्धा जिल्ह्यात १३ रुग्णांपैकी आठवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. भंडारा जिल्ह्यात चार रुग्ण आढळले आहेत. यातील दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर इतर दोघांवर खासगीत उपचार सुरू आहेत.

    म्युकरमायकोसिस हा आजार पोस्ट कोव्हिड डायबेटिक रुग्णांमध्ये आढळून येतो. त्यामुळे कोव्हिड होऊन गेल्यानंतरही मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. हा आजार नाकावाटे सुरू होऊन घशात, डोळ्यात व नंतर मेंदूत प्रवेश करतो. सध्या कोरोनासोबतच रुग्णालय प्रशासनापुढे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना हाताळण्याचीसुद्धा जबाबदारी वाढलेली आहे.

    घाबरून जाण्याची गरज नाही
    कोरोनातून बरे झालेले बरेच रुग्ण आता म्युकरमायकोसिसच्या भीतीने तपासणी करण्याकरिता येत आहेत. मात्र रुग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त असे काही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. लागलीच उपचार झाल्याने हा आजार बरासुद्धा होऊ शकतो…, अशी माहिती अकोल्यातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. सोनल मोदी यांनी दिली.

    जनजागृती आवश्यक
    म्युकरमायकोसिससाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स व यंत्रसामग्रीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हा प्रशासन व सर्वोपचार रुग्णालयाला दिले आहेत. करोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये योग्य ती जनजागृती करून या आजारापासून कसे वाचता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या सूचना केंद्रीयमंत्र्यांनी दिल्या आहेत.

    औषधींचा तुटवडा
    रेमडेसिव्हिर इंजेक्शननंतर आता म्युकरमायकोसिस या आजाराकरिता लागणारी इंजेक्शनसुद्धा बाजारात उपलब्ध नाहीत. या औषधांचा तुटवडा सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. एका रुग्णाला पन्नासपेक्षा जास्त इंजेक्शन लागतात. अचानक मागणी वाढल्याने हा तुटवडा झाला असल्याचे मत एका औषधविक्रेत्याने व्यक्त केले आहे.

    ‘पोस्ट कोव्हिड’ उपचार गरजेचा
    करोना होऊन गेल्यानंतर १४ दिवसांनी रुग्ण आपल्याला करोना झाला होता हे विसरून पुढचे उपचार थांबवून देतो. खरे तर करोनानंतर प्रचंड अशक्तपणा शरीरात निर्माण झालेला असतो. त्यामुळे पोस्ट कोव्हिड उपचार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोव्हिड केअर नावाचा एक कक्षसुद्धा तयार आहे.

    येथे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्तीसुद्धा झालेली आहे. मात्र कोव्हिड झाल्यानंतरच्या उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने, हा आजार बळावू शकतो अशी शंका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पोस्ट कोव्हिड उपचार घेणे अतिशय गरजेचे असल्याचे मतही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.