मनपात उशीरा येणाऱ्या ४५ कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कापले

अकोला (Akola).  शहरातील महानगर पालिकेत आज सोमवारी सकाळी उशिराने येणाऱ्या 45 कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आले. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.

अकोला (Akola).  शहरातील महानगर पालिकेत आज सोमवारी सकाळी उशिराने येणाऱ्या 45 कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आले. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.

मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी करण्यात आली. यामध्‍ये एकूण 45 कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. ही बाब कार्यालयीन कामकाजाच्‍या दृष्‍टीने शिस्‍तीस अनुसरून नसून कर्तव्‍यात कसूर करणारी असून नगरसचिव विभागातील 2, नगररचना कार्यालयाचा 1, जलप्रदाय विभागाचा 1, विद्युत विभागातील 21, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) विभागातील 3, पुर्व झोन कार्यालयातील 2, पश्चिम झोन कार्यालयातील 1, उत्‍तरझोन कार्यालयातील 13, दक्षिणझोन कार्यालयातील 1 असे एकुण 45 कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्‍यात आले आहे.