वाहनाच्या धडकेत एक ठार; दोन गंभीर जखमी

आकोट (Aakot) : अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील ग्राम पणज येथे मॅक्झिमो आणि दुचाकी वाहनाच्या अपघातात एका महिलेचा अकोला येथे उपचारादम्यान मृत्यू झाला. नजीरा बी सय्यद इरशाद (वय 55 वर्ष) रा. पणज असे मृतक महिलेचे नाव आहे. या अपघातात सय्यद हारून सय्यद युनूस (वय 45 वर्ष) आणि वाजीदा परवीन (वय 40 वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंजनगाव वरून भरधाव वेगाने येणाऱ्या मॅक्सिमो एमएच 41 व्ही 3856 या वाहनाने पणज येथे घराजवळच एमएच 30 व्ही 1444 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पणज येथील दुचाकीवर बसलेले तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते, परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान एका महिलेचा आज मृत्यू झाला असून, गंभीर जखमी असलेल्या इतर दोन जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते. सदर घटनेचा तपास ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.