‘पीएम’ किसान सन्मान योजना: 2 लाखांवर शेतकऱ्यांना दिलासा!

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार 326 शेतकऱ्यांना पहिला हप्त्याची रक्कम प्राप्त झाली असून, ही रक्कम त्यांना रब्बीसाठी कामी येणार असल्याने शेतकरीवर्ग समाधान व्यक्त करीत आहे.

  • पहिला हप्ता रब्बीसाठी येणार कामी

अकोला (Akola).  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 5 हजार 326 शेतकऱ्यांना पहिला हप्त्याची रक्कम प्राप्त झाली असून, ही रक्कम त्यांना रब्बीसाठी कामी येणार असल्याने शेतकरीवर्ग समाधान व्यक्त करीत आहे.

केंद्र सरकारने सीमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठीची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून, या योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतात. शेतकऱ्यांना या पैशांचा त्वरित वापरही करता येतो. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी पीएम किसान संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो.

शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय, कोणताही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदविता येते. त्यामुळे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविण्यापासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास दोन लाखावर शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.