जुन्या शहरातील वरली अड्ड्यावर पोलिसांचा छापा

  • आरोपींविरुद्ध कारवाई, वरली साहित्य जाळले

अकोला (akola).  डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत शरीफनगरात सुरू असलेला अंसार आणि लड्डा यांचा वरली अड्डा पोलिसांनी शनिवारी दुपारी ध्वस्त केला. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी डाबकी रोड पो. स्टे.चे निरीक्षक विजय नाफडे यांच्यासह कारवाई केली.

शरीफनगरात वरली अड्डा चालवण्यात येत असल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी छापा मारुन कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेले वरलीचे साहित्य जाळले. आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागात चालवण्यात येत असलेले जुगार अड्डे ध्वस्त करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले आहेत. गुन्हेगारांमध्ये कारवायांमुळे धडकी भरली आहे.