महिला आणि तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय; उच्चभ्रू वस्तीत चालायचा घाणेरडा खेळ

पैशांच्या मोबदल्यात ग्राहकांच्या मागणीनुसार आदर्श कॉलनी इथं तरुणींचा पुरवठा होत होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    अकोला (Akola) : अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीत देहविक्री (Akola Sex Racket) सुरू असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला (raid) आहे. यावेळी पोलिसांनी कारवाई करत तीन महिला व दोन पुरुषांना अटक केली आहे.

    अकोल्यातील गौरक्षण रोडवरील (Gaurakshan Road in Akola) आदर्श कॉलनीतील (Adarsh ​​Colony) एका घरात देहविक्री (Prostitution) सुरू होती. याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या परिसरात दाखल होत तीन महिलांसह दोन ग्राहकांना ताब्यात घेतलं. पैशाचे अमिष दाखवून माहिला आणि तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

    करोना संसर्ग काळातही देहविक्रीच्या घटना समोर येत आहेत. अशातच पैशांच्या मोबदल्यात ग्राहकांच्या मागणीनुसार आदर्श कॉलनी इथं तरुणींचा पुरवठा होत होता. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत अकोट फाइल परिसरातील जत्वन नगरातून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा व चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. आतिश दुर्योधन खंडारे (Atish Duryodhan Khandare) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून अकोला पोलिसांनी ही कारवाई केली आहे.