unsafe women

  • अंगणवाड्यांसाठी आला ६ कोटी २८ लाखाचा निधी

आकोट (जि.अकोला). अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणा-या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी या बाबत आदेश दिला.

येथील आरोपी राजेश तुळशीराम काळमेघ (३१) रा. श्रीरामनगर अकोट व मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम (३३) रा. सायाबाजार तालुका कादीपूर जिल्हा सुलतानपूर (उत्तर प्रदेश) यांनी अकोट येथे अल्पवयीन मुलीला परराज्यातून फूस लावून पळवून आणले. तिच्यावर अत्याचार करुन तिला वेश्याव्यवसायात अडकवण्यासाठी प्रवृत्त करीत होते. दोन्ही आरोपी जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत.

या प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी लेखी उत्तर सादर करून युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला.