गीतानगरातील क्रिकेट सट्ट्यावर छापा; तिघांना अटक

अकोला (Akola) : गीतानगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करुन तिघांना अटक केली व त्यांच्याजवळून ६७ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली.

हरिहरपेठेतील हर्षद चाळसे, शिवा थेटे आणि राजपुतपु-यातील प्रयाग मिरजामले यांना रंगेहात पकडले. आरोपींजवळून जुनेशहर पोलिसांनी जुगाराचे साहित्य जप्त केले. शनिवारी पोलिसांनी केलेली दुसरी कारवाई होती.