रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ११३ चाचण्या, १२ पॉझिटिव्ह

अकोला (Akola). कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात शुक्रवारी दिवसभरात ११३ चाचण्या झाल्या. त्यात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे १८ चाचण्या झाल्या त्यात ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे ३ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. बार्शीटाकळी येथे ४ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुर्तिजापूर येथे २ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही.

अकोला आयएमए येथे ३८ चाचण्या झाल्या. त्यात ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ३९ वैद्यकीय कर्मचा-यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ९ चाचण्या झाल्या त्यात २ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. असे दिवसभरात ११३ चाचण्यांमध्ये १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत १८,७६४ चाचण्या झाल्या. त्यात १३५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.