Corona Virus Photo

  • आतापर्यंत १४,९१३ जणांच्या कोरोना चाचण्या

अकोला(Akola).  कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड अँटीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल सोमवारी दिवसभरात झालेल्या १२९ चाचण्या झाल्या त्यात ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

सोमवारी दिवसभरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये अकोट येथे ६० चाचण्या झाल्या त्यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे ११ चाचण्या झाल्या. त्यात एकाचा अहवाल पॉजिटिव्ह आला, तेल्हारा येथे १५ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आयएमए अकोला येथे चाचण्या झाल्या नाही, ४३ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात १२९ चाचण्यांमध्ये ८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर आजपर्यंत १४,९१३ चाचण्या झाल्या. त्यात ९६७ जणांचे अहवाल काल सोमवारी १५ सप्टेंबर रोजी पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.