महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती; अर्जासाठी १५ पर्यंत मुदतवाढ

सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.

    अकोला(Akola).  सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.

    महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्गांसाठी केंद्राची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवरून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

    त्यासाठी एचटीटीपीएस://महाडीबीटीमहाआयटी.गव्ह.इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे. वेळेच्या मर्यादेत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्याची जबाबदार संबंधित महाविद्यालयाची असेल. विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी अर्ज भरावे, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.