शाळा उघडल्या पण विद्यार्थ्यांची नगण्य उपस्थिती; पालकांकडूनही नकारघंटा

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यादृष्टीने शाळांच्या व्यवस्थापनाने वर्ग खोल्या, शाळांचा परिसर सॅनिटाईज केला परंतु जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र, अत्यल्प होती.

(Akola).  कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. त्यादृष्टीने शाळांच्या व्यवस्थापनाने वर्ग खोल्या, शाळांचा परिसर सॅनिटाईज केला परंतु जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र, अत्यल्प होती.

अकोला तसेच जिल्ह्यातील विविध शाळांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाने शाळांमध्ये व्यवस्था करुन ठेवली होती. सकाळपासून बाहेरुन आलेल्या व्यक्तींना सॅनिटाईझ केले जात होते. शाळांनी पालकांकडून संमतीपत्र मागितले असून संमतीपत्राची खातरजमा करुनच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती शाळांच्या व्यवस्थापनाने दिली. शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली असून या बाबत संदेह नाही, असे शिक्षण अधिका-यांनी सांगितले.

तालुक्यातील २२० पैकी २१७ शाळा उघडल्या
अकोला तालुक्यातील २२० पैकी २१७ शाळा सोमवारी उघडल्या. येथे शिक्षकांची उपस्थिती होती परंतु विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांनी दिली.