दुकानांना सात वाजेपर्यंत परवानगी, मग धार्मिक स्थळांना का नाही!

अकोला शहरातील ग्रामदैवत राजराजेश्वर, सालासर बालाजी, रामदेव बाबा, श्याम बाबा, संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर, प्राचीन जैन मंदिर तसेच अनेक धार्मिक स्थळे बंद आहे. संध्याकाळी आठ वाजता पर्यंत सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी.

    अकोला. जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मागणीची दखल घेऊन संध्याकाळी सात वाजता पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु धार्मिक स्थळे बंद का ठेवण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करीत धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी जिल्हा भाजपाने केली आहे.

    अकोला शहरातील ग्रामदैवत राजराजेश्वर, सालासर बालाजी, रामदेव बाबा, श्याम बाबा, संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठे राम मंदिर, प्राचीन जैन मंदिर तसेच अनेक धार्मिक स्थळे बंद आहे. संध्याकाळी आठ वाजता पर्यंत सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी. धार्मिक कार्यक्रम व गर्दी होणार नाही याचे नियोजन मंदिर प्रशासन घेईल. याशिवाय बँड पथकाची सुद्धा बंदी हटविण्यात यावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

    सरकार महापाप करीत आहे- आमदार गोवर्धन शर्मा
    धार्मिक स्थळाच्या ठिकाणी असणारे छोटे मोठे दुकानदार सुद्धा बेरोजगार होऊन त्यांच्यावरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या पापाचे भागीदार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आहे. येत्या तीन दिवसात याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.