सोयाबीनचे दर खरीप हंगामातही वाढलेलेच! हरभऱ्याचे दर हमी दराच्या खालीच

  अकोला (Akola).  या वर्षी सोयाबीनच्या दराने (Soybean prices) विक्रमी दर (highs record) गाठले. या दरात वाढ अद्यापही कायम आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने होतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही. बाजार समितीत आवक कमी आहे; परंतु सोयाबीनच्या दरात तेजी (soybean prices continue to rise) कायम आहे.

  सोयाबीनला ७७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे; मात्र हरभऱ्याचे दर हमीदराच्या खाली आले आहेत. गतवर्षी सोयाबीन उत्पादक देशांमध्ये या शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली.

  सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी आली आहे. गत सहा महिन्यांपासून सोयाबीनच्या दरातील तेजी कायम आहे. काही महिन्यांपूर्वी अकोला येथील बाजार समितीत सोयाबीनचे दर ८ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. मध्यंतरी या शेतमालाच्या दरात थोडी घसरण होऊन सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ६८०० ते ७००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते; परंतु आता पुन्हा या होतमालाच्या दरात तेजी आली असून, सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ७,५०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोमवारी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेतून हे स्पष्ट झाले आहे.

  बाजार समितीत शेतमालाची स्थिती
  शेतमाल आवक          दर (प्रति क्विंटल)
  सोयाबीन         —      ३७६ ७७००
  हरभरा            —       २०८ ४५००
  तूर                  —       ४९७ ६१००

  शेतकरी म्हणतात…
  गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पीक खराब होऊन पडलेल्या दरात विकले. आता दर चांगले आहे; परंतु हे दर दोन-तीन महिने कायम राहिल्यास फायदा होईल.