प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

अकोला (Akola):  जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री आगर येथे वरली मटका जुगारावर छापा टाकून १२ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

निंबा फाटा येथे वरली मटका जुगाराच्या खेळाबाबत माहिती या पथकाला मिळाली. त्याआधारे विशेष पथकाने आगर येथे कारवाई केली. यावेळी गणेश सहदेव बोर्डे, प्रमोद लक्ष्मण वासनकार, नंदकिशोर विष्णू मेहकरे, रमेश दुर्याधन इंगळे, रामेश्वर मरी बागडे, भीमराव केरोजी सिरसाठ, संतोष महादेव पातोडे, दशरथ महादेव इंगोले, बाळकृष्ण समाधान सिरसाठ, बशीर शहा शन्नू शहा, सत्यवान सोमाजी तेलगोटे, रफीक शहा नबी शहा यांना अटक करण्यात आली.

त्यांच्याकडून रोख ९६७० रुपये, सहा मोबाइल, मोटार सायकली असा एकूण १.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध पोलिस ठाणे उरळ येथे गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विशेष पथक मिलींदकुमार अ. बहाकर व त्यांच्या पथकाने केली.