शासकीय रुग्णालयांना दिले स्ट्रेचर, व्हील चेअर; खासदारांच्या सी.एस.आर. फंडातून उपलब्धता

अकोला जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आपल्या सी.एस.आर फंडातून अकोला जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रांना स्ट्रेचर, व्हील चेअर प्रदान केल्या आहेत.

    अकोला (Akola).  जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आपल्या सी.एस.आर फंडातून अकोला जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रांना स्ट्रेचर, व्हील चेअर प्रदान केल्या आहेत. त्याअंतर्गत अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयास प्रत्येकी 35 स्ट्रेचर आणि व्हील चेअर जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

    यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, अनुप धोत्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम सिरसाम, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, माधवराव मानकर, जयंतराव मसने, संजय बडोणे, चंदा शर्मा, अश्विनी हातवळणे, सारिका जयस्वाल, सुनीता अग्रवाल, देवाशीष काकड, नीलेश निनोरे, संतोष पांडे, अमोल गोगे, गणेश अंधारे, संजय गोटफोडे, मोहन पारधी, मनोज शाहू आदि यावेळी उपस्थित होते.

    सकारात्मक दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे जागतिक महामारीच्या काळात गेल्या 14 महिन्यांपासून सातत्याने क्रियाशील राहून अकोलेकरांना आरोग्य सेवेत त्रास होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आवश्यक वस्तूंसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.