अशी परिस्थिती शत्रुवर येऊ नये, काँग्रेस आमदाराचा भयानक अनुभव

आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. हा अनुभव त्यांना ज्या रात्री आला त्या रात्रीचे वर्णन मिटकरी यांनी एक निगरगट्ट रात्र असे केले आहे. त्यांनी सांगितले की,"मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र " माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना ICU मध्ये ऍडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती.

अकोला : जीवघेण्या कोरोना साथीच्या (Corona virus) आजारात काही खासगी रुग्णालये व डॉक्टरांकडून रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीचा भयंकर अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ( Congress MLA) अमोल मिटकरी यांनी सांगितला आहे. मी घेतलेला अनुभव (experience )फार भयानक होता. अशी वेळ शत्रुवर सुद्धा येऊ नये अशी भावना त्यांनी हा अनुभव (terrible experience ) सांगताना व्यक्त केली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. हा अनुभव त्यांना ज्या रात्री आला त्या रात्रीचे वर्णन मिटकरी यांनी एक निगरगट्ट रात्र असे केले आहे. त्यांनी सांगितले की,”मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र ” माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क केला. संपर्क याकरिता केला की त्यांच्या वडिलांना ICU मध्ये ऍडमिट करायला बेड आणि व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती. ज्यांनी फोन केला ते आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम होते. अकोल्यामध्ये “आयकॉन” आणि “ओझोन “असे दोन हॉस्पिटल आहेत. मात्र तिथे त्यांची व्यवस्था होऊ शकली नाही. पैसा उपलब्ध असतानासुद्धा अकोला जिल्ह्यात बेड उपलब्ध न होणे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

सर्वानुमते निर्णय घेऊन एका खाजगी डॉक्टरच्या सल्ल्या वरून आम्ही पेशंट ला नागपुर मध्ये “वोकार्ड” हॉस्पिटल ला (बेड व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे सांगितल्यावर) त्यांच्यावर विश्वास ठेवून एका सुसज्ज ॲम्बुलन्स मध्ये रात्री एक वाजता मेडिकल ऑफिसर घेऊन नागपूरला पाठविले. रात्री साडे तीन वा. पेशंट घेऊन ॲम्बुलन्स त्या हॉस्पिटल समोर पोहोचली. मला रात्री साडेतीन वाजता मित्रांनी कॉल केला व ॲम्बुलन्स बाहेर उभी आहे मात्र आत बेड उपलब्ध नाहीत असे डॉक्टर सांगताहेत असे सांगितले. पेशंट फक्त ऑक्सिजनवर आहे आणि खाजगी डॉक्टर च्या सांगण्यावरून आपण तिथपर्यंत पेशंट पाठवल्यानंतर सुद्धा समोरच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करत नसतील तर ही बाब फार गंभीर आहे.मी तितक्याच रात्री एका खाजगी कोविड सेंटर वर काही डॉक्टर मित्र व मी अनेक डॉक्टरच्या संपर्कात राहिलो मात्र रात्री साडेतीन वाजता कुठल्याच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही. नागपूरमधील लता मंगेशकर हॉस्पिटल, Kings Way Hispital, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, ऍलेक्सीज हॉस्पिटल, Woachard हॉस्पिटल, ७ स्टार हॉस्पिटल,आदी हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर मुंदडा, डॉक्टर मरार, डॉ. अग्रवाल, सुजाता मॅडम, कावेरी मॅडम, आदी डॉक्टरांशी संपर्क केला मात्र या सर्व श्रीमंत डॉक्टरांपैकी कोणीही कुठलाही कसलाही प्रतिसाद दिला नाही.

“मी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र ”
माझ्या मित्रांचे वडील काल कोरोना पॉझिटिव्ह आले हे समजताच त्यांनी मला संपर्क…

Posted by Amol Mitkari on Sunday, September 13, 2020

नंतर वर्धा, सावंगी मेघे, याठिकाणी फोन केले. पेशंटला परत इथे आणावे का तर अकोल्यातील सर्व दवाखान्यात फोन केले. सरकारी दवाखाने हाउसफुल, प्रायव्हेट दवाखाने हाउसफुल, नागपुर मधील दवाखाने हाउसफुल, पेशंट कडे स्वतःच्या गाड्या आहेत, अनेक मोठ्या लोकांशी संपर्क आहेत, असे असताना सुद्धा पेशंटला एक व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसणे हे फार धक्कादायक आहे. अखंड प्रयत्नानंतर शेवटी सरकारी दवाखान्यातच सद्यस्थिती पेशंटला भरती करावे लागले आहे.

(विचार करण्यासारखी बाब ही की मी आमदार असतांना व पेशंट सुद्धा आर्थिक सक्षम असतांना जर प्रायव्हेट डॉक्टर्स असा जीवघेणा खेळ खेळून, रात्री फोन बंद करून प्रतिसाद देत नसतील तर सामान्य माणसाचं जगणं म्हणजे हा एक फक्त खेळ आहे असे समजायचे का?? )

श्रीमंत लोकांची अशी अवस्था तर गोरगरिबांच्या अवस्था किती बिकट असतील ना?? आता ह्या साखळ्या शोधून काढाव्या लागतील. मग आमच्या जीवाशी खेळायची वेळ आली तरी बेहत्तर. मात्र हा माज, ही मस्ती अशीच सुरु राहिली तर येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाच्या व्यक्ती जग सोडुन गेलेल्या असतील.

तूर्तास आपल्या मदतीला काही नं टाकतोय, संकटात असणाऱ्यांना मदत करावी ही विनंती. आपल्या सर्वांनी मिळून आता हे संकट ओळखायला शिकलो पाहिजे. गरजवंताना मदत करा. मी घेतलेला अनुभव फार भयानक होता. अशी वेळ शत्रुवर सुद्धा येऊ नये. असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.