जलकुंभासाठी परत निविदा बोलाविणार; अतिरिक्त खर्चाचा जुन्या कंत्राटदाराला भुर्दंड

अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरणाच्या कामातील रखडलेल्या एका जलकुंभाच्या कामासाठी पुन्हा निविदा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती आहे. योजनेचे काम करणा-या याकंत्राटदाराने कामास नकार दिला.मात्र या निविदा मागील निविदेपेक्षा अधिक दराने आल्यास जो अधिक दर येईल, ते देयक जुन्या कंत्राटदाराच्या देयकातून कपात केले जाणार आहे.

    अकोला (Akola).  अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सबलीकरणाच्या कामातील रखडलेल्या एका जलकुंभाच्या कामासाठी पुन्हा निविदा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती आहे. योजनेचे काम करणा-या याकंत्राटदाराने कामास नकार दिला. मात्र या निविदा मागील निविदेपेक्षा अधिक दराने आल्यास जो अधिक दर येईल, ते देयक जुन्या कंत्राटदाराच्या देयकातून कपात केले जाणार आहे.

    पाणी पुरवठा सबलीकरणाअंतर्गत क्षतिग्रस्त जलवाहिन्या बदलणे, ज्या भागात (मनपाची मुळहद्द) जलवाहिन्या नाहीत, त्या भागात जलवाहिन्या टाकणे, जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्त्या, शहरात आठ नवीन जलकुंभ बांधणे आदी कामांचा समावेश होता. या आठ जलकुंभापैकी सात जलकुंभाचे काम सुरु झाले. मात्र जुन्या शहरातील डॉ. आंबेडकर मैदानात बांधण्यात येणा-या जलकुंभाच्या जागेबाबत काही जणांनी आक्षेप घेतल्याने कंत्राटदाराला काम सुरु करता आले नाही.

    या अनुषंगाने मनपाने पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. यासाठी पोलिस प्रशासनाकडे सात लाखांचा भरणा केला. मात्र पाणी पुरवठा योजनेच्या सबलीकरणाच्या कामाची मुदत 31 मार्चला संपत असल्याने जलकुंभाच्या कामासाठी दोन वर्ष लागण्याची शक्यता लक्षात घेवून कंत्राटदाराने या जलकुंभाचे बांधकाम सुरु करण्यास नकार दिला. कंत्राटदाराने नकार दिल्याने रिस्की निविदा बोलावणार आहेत. मागील निविदेपेक्षा अधिक दराने यानिविदा आल्यास मुळ निविदे व्यतिरिक्त जे अधिक पैसे मनपाला खर्च करावे लागतील, तो खर्च जुन्या कंत्राटदाराच्या देयकातून कपात करणार आहे.