orona

  • आणखी एकाचा बळी, पॉझिटिव्ह रूग्णही वाढले

अकोला (Akola).  जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच मूर्तिजापूर तालुक्याला कोरोनाने आपल्या पूर्ण विळख्यात घेतले आहे. रविवार २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०९ वर पोहोचला असून, सर्वोपचार रूग्णालयाच्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये ५८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ६४९३ झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाच्या प्रयोगशाळेतून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २२ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मूर्तिजापूर येथील सर्वाधिक २१ जणांसह वाडेकर लेआऊट येथील सहा, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी व चान्नी ता. पातूर येथील प्रत्येकी तीन, पातूर येथील दोन, सुधीर कॉलनी, आनंद नगर, शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक अशा ५८ रुग्णांचा समावेश आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. तिला १७ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी ४६९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५९२ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर कोरोना वॉर्डांमध्ये उपचार सुरु आहेत.