अकोला शहरात प्रशासनाच्या बेपवाईपणामुळे रखडलेले उड्डाणपुलाचे काम
अकोला शहरात प्रशासनाच्या बेपवाईपणामुळे रखडलेले उड्डाणपुलाचे काम

  • ८ दिवसात पुलाखालील रस्ता करण्याचे निर्देश

अकोला (Akola). जिल्हा कारागृह ते अकोला क्रिकेट क्लब दरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथगती कामाबाबत अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी  नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिका-यांना धारेवर धरले. पुलाखालील रस्ता ८ दिवसात व्यवस्थित झाला नाही तर आपण आपल्या पद्धतीने विषय मार्गी लावू, असा इशारा दिला.

उड्डाणपुलाचे काम कासवगतीने होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामाची गती वाढवा, कंत्राटदाराला सूचना द्या, असे निर्देश बच्चू कडू यांनी बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले. गेल्या महिन्यात आपण पुलाखालील रस्त्याविषयी सांगितले होते परंतु काहीही प्रगती दिसली नाही. त्यामुळे ८ दिवसांत काम व्यवस्थित करा, अशी सूचना त्यांनी केली. कामाच्या प्रगतीची पाहणी त्यांनी केली.