Corona Virus

  • २०२ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

अकोला (Akola).  जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतीवर आहे. शासकीय मेडिकल काॅलेज आणि सर्वोपचार रुग्णालयाद्वारे प्राप्त अहवालानुसार २९९ संशयित रुग्णांच्या करोना अहवालापैकी ९७ रुग्णांची रिपोर्ट पाॅझिटिव्ह आली आहे.
रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये शनिवारी १४ रुग्णांची रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आली होती. अशाप्रकारे १११ रुग्णांची रिपोर्ट पाॅझिटिव्ह आली आहे. २०२ रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये ३७ महिला आणि ६० पुरुषांचा समावेश आहे.