अकोला शहरातील सौंदर्यस्थळांची झाली दुर्दशा; जागोजागी कचऱ्यांचे ढिगार

शहराचे सौंदर्य वाढीला लागावे या उद्देशाने महत्वाच्या चौकांचे सौंदर्यीकरण महापालिकेकडून करण्यात आले होते. लाखो रुपये त्यावर खर्च झालेत; परंतु आता त्या सौंदर्यस्थळांची रया गेलेली दिसत आहे. काही ठिकाणच्या मूर्तींची अवहेलना होत आहे. तसेच स्वच्छतेबाबतही दुर्लक्ष झालेले दिसत आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अकोला (Akola)  शहराचे सौंदर्य वाढीला लागावे या उद्देशाने महत्वाच्या चौकांचे सौंदर्यीकरण महापालिकेकडून करण्यात आले होते. लाखो रुपये त्यावर खर्च झालेत; परंतु आता त्या सौंदर्यस्थळांची रया गेलेली दिसत आहे. काही ठिकाणच्या मूर्तींची अवहेलना होत आहे. तसेच स्वच्छतेबाबतही दुर्लक्ष झालेले दिसत आहे. याकडे मनपा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॉवर चौक हा येथील महत्वाचा चौक आहे. शहराची ओळख बनलेला असल्याने टॉवर चौकाला महत्व आहे. परंतु टॉवरच्या आजुबाजूला नजर टाकली तर कचरा पडलेला दिसतो. रिकाम्या बाटल्या दिसतात. तसेच लोकांनी संरक्षक भिंत फोडून दुपारच्या निद्रेची सोय केलेली पाहायला मिळते. या भागाची स्वच्छता दररोज होणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नाही. या बाबतही स्थानिक लोक नाराजी व्यक्त करतात.

शहरात विकासकामे सुरू असल्याने धुळीचे लोट दिसतात. त्यामुळे लोकांना तर त्रास होतोच तसेच सौंदर्यस्थळांवर देखील धुळीचे थर दिसतात. हा भाग स्वच्छ व्हावा, त्या ठिकाणी फुलझाडे लावून सौंदर्यात भर टाकता येईल का, याकडेही लक्ष दिले जात नाही, अशी ओरड निसर्गप्रेमींकडून होत आहे. विकास कामासोबत मनपा प्रशासनाने या बाबींकडेही तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.