नाग जीव वाचविण्यासाठी मुंगुसाशी सर्व क्षमतेनी लढला; पण अखेर….

    अकोला (Akola) : मुंगूस (mongoose) आणि सापाचं (snake) वैर सर्वांनाच माहित आहे. अकोलेकरांनी (Akola district) याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात (Barshitakali taluka) पार्डी (Pardi) गावात नाग आणि मुंगसाच्या लढाईचा थरार पाहायला मिळाला. रस्त्याच्या मधोमध दोघांचे हे भांडण सुरु होते. जवळपास दहा मिनटं दोघांमध्ये ही झटापट झाली. अखेर मुंगसाने विषारी नागाचा फणा पकडला आणि त्याला नामोहरण केले.

    साप-मुंगूसाचं वैर म्हटले की डोळ्यासमोर येते, त्यांच्यातील टोकाचं वैर. पार्डी गावात भरपावसात सर्प आणि मुंगुसाचं हेच वैर थेट पाहायला मिळाले. पाऊस सुरू असतांनाच साप-मुंगूसाच्या लढाईचा लाईव्ह थरार अनुभवता आला. अगदी रस्त्याच्यामध्ये हे जीवघेणं युद्ध सुरु होतं. अखेर मुंगूसाने सापाला ठार मारत ही लढाई जिंकलीय. हा सारा थरार अगदी अंगावर काटा आणणारा होता.