प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

अकोला (Akola) :  बाळापूर तालुक्यातील नागद येथील एक युवक शेतात जात असताना त्याचा पाय घसरून, तोल जाऊन तो नदीत पडल्याने वाहून गेल्याची घटना शुक्रवार रोजी सकाळच्या सुमारास घडली. निशांत गंगाराम मोर्डे (वय २२) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

हा युवक सकाळी शेतात कामाला जात असताना, पाय घसरून नदीपात्रात कोसळला. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने तो युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला.  घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार विलास पाटील घटनास्थळी पाहोचले. त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकासह ग्राम प्रशासन व नागरिकांनी नदी परिसरात शोध मोहीम सुरू केली; परंतु युवक सापडला नाही.

सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहिमेत अडचण निर्माण झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला असल्याचे संत गाडगेबाबा बचाव पथकाचे अंकुश सदाफळे यांनी सांगितले.