Corona-Virus-Image

अकोला (Akola).  जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३१ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आले. तर तीन मृत झाले.

अकोला (Akola). जिल्ह्यात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३१ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आले. तर तीन मृत झाले.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8,267 झाली आहे. आज दिवसभरात 12 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42,420 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 41,317 फेरतपासणीचे 222 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 881 नमुने होते. आजपर्यंत एकूण 42,325 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35,655 तर पॉझिटीव्ह अहवाल 8,267 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज एक पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात एक जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी एक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एक पुरुष असून तो सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

आज तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तीन जणाचा मृत्यू झाला. त्यात दाखणी फाईल, अकोट येथील 80 वर्षीय महिला असून ती 21 ऑक्टोंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला, गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील 40 वर्षीय पुरुष असून तो 13 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर बाभुळगाव जहांगीर येथील 85 वर्षीय पुरुष असून तो 19 ऑक्टोंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

४९४ रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8,267 आहे. त्यातील 274 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 7,499 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 494 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.