corona

अकोला (Akola) :  गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कहर करीत असलेल्या कोरोना संसर्गाचे प्रमाण एकीकडे कमी होत असल्याचे दिसत आहे; मात्र तरीही मृत्यूचे सत्र मात्र थांबलेले नाही. मंगळवार, 13 ऑक्टोबर रोजी पातूर जिल्ह्यातील आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 259 वर गेला आहे. सर्वोपचारच्या प्रयोगशाळेमध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये आठ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या 7841 झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचारच्या प्रयोगशाळेकडून 73 अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित 65 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रामदासपेठ येथील तीन जणांसह मोठी उमरी, गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प, जिल्हा परिषद कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये खडकी खदान येथील 64 वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील 30 वर्षीय महिला व बार्शीटाकळी येथील 56 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7841 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल 7180 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत 402 अॅवक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये १३ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी अकोला जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्टची मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये सोमवारी दिवसभरात झालेल्या 184 चाचण्यांमध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. अकोट येथे 36 चाचण्या झाल्या. त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बार्शीटाकळी येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तेल्हारा येथे सहा चाचण्या झाल्या. त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आयएमए येथे 52 चाचण्या झाल्या, त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 15 चाचण्या झाल्या, त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर हेडगेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या, त्यात दोन जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात 184 चाचण्यांमध्ये 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजपर्यंत 19, 124 चाचण्या झाल्या त्यात 1,380 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.