आज अकोला जिल्ह्यात आढळले ३३ पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

अकोला (Akola). आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील 72 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एकाचा मृत्यू झाला.

अकोला (Akola). आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील 72 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तर एकाचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 6 जण व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे 7 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8,178 झाली आहे. आज दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 42,080 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 40,998 फेरतपासणीचे 214 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 868 नमुने होते. आजपर्यंत एकूण 41,863 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 35,258 तर पॉझिटीव्ह अहवाल 8,178 आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज २० जण पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर व गणेश नगर येथील प्रत्येकी तीन जण, तर उर्वरीत जैन मंदिर, रुख्मिणी नगर, जठारपेठ, मोठी उमरी, रामदासपेठ, बोरगांव मंजू, खांडला, शास्त्री नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड, खिरपुरी ता. बाळापूर, गणेश नगर, वाडेगाव ता. बाळापूर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा व डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कृपया नोंद घ्यावी.

१६ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12 जणांना, सुर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रिजेंसी येथून तीन जणांना, अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.