व्यापाऱ्यांचे पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन; पोलिसांनी काढली समजूत

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत वाढ झाली. राज्य शासनाने शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन व सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

    अकोट (Akot).  कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या झपाट्याने वाढत असून, महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संख्येत वाढ झाली. राज्य शासनाने शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन व सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

    या निर्णयाविरोधात अकोट शहरातील रेडीमेड कापड, कटलरी व इतर व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये जावून काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शहर पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना शांत केले, दरम्यान व्यापारी असोसिएशने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

    अकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही शासनाला नेहमी सहकार्य केले आहे तसेच सर्व व्यापारी बांधवांनी कोविड चाचणी केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे 5 हजार कामगार व त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. तरी शासनाने प्रतिबंध हटवून दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व्यावसायिकानी केली आहे.