प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    अकोला (Akola).  दोन दिवसापूर्वी अकोट-शेगाव मार्गावरील (Akot-Shegaon road) लोहारा गाव (Lohara village) जवळील मन नदीवरील पुलाचा काही भाग खचला होता.त्यात कोंबड्या घेऊन टेम्पो पलटी झाला होतो.काल या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने माती व मुरूम टाकून सदर मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आली होती.

    मात्र आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक अडकला आहे. यामुळे अकोट शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद झाली आहे.नवीन पुलाचे बांधकाम केल्या जात असून कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळच खोदकाम केल्यामुळे हा अपघात घडला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत आहे.