Two charged in illegal transport of bullocks in Borgaon Maunju
अटक करण्यात आलेल्या बैल तस्करांसह बोरगाव मंजू पोलिसांची टीम

  • दोन लाखांचा ऐवज जप्त; बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई

बोरगाव मंजू (जि.अकोला) (Akola).  राष्ट्रीय महामार्गावरून बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटेपूर्णा नजीक एका मालवाहू टाटा गाडीतून निर्दयतेने कोंबून दोन बैल वाहून नेत असता पोलिसांनी पकडून दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून दोन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुर्तीजापुर कडून एका मालवाहू गाडी मध्ये दोन बैल निर्दयतेने कोंबून बोरगाव मंजू कडे येत असल्याची माहिती बोरगाव मंजू ठाणेदार हरीश गवळी यांना मिळाली वरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दीपक कानडे, धनसिंग राठोड, योगेश काटकर यांनी पाळत ठेवून, सापळा रचून सदर वाहन काटेपूर्णा नजीक मालवाहू गाडी क्र.एम.एच.३० ए.बी.३२२१ वाहन काटेपूर्णा नजीक थांबवीले असता दोन बैल ( गोधन) निर्दयतेने कोंबून मुर्तीजापुर कडून बोरगाव मंजू कडे येत होते.

सदर वाहनाची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वाहन चालका जवळ कुठलेही रीतसर परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. सदर वाहन किंमत दीड लाख रुपये दोन बैल किंमत ५० हजार रुपये असा एकूण दोन लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून सैय्यद शाकीब अली व सैय्यद अजीम सैय्यद अजमत अली दोन्ही राहणार बोरगाव मंजू यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी करीत आहेत.