प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

अकोला (Akola). अकोल्याहून दर्यापूरच्या दिशेने चार जण कारने जात असताना करतखेड़ा जवळ कारने प्रवाशी शेडला जोरदार धडक दिली. या अपघातात अकोल्यातील दोघांचा मृत्यू झाला तर उरलेले दोघे जण गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातातील दोघांना दर्यापूर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर सांगितली जात आहे.

दर्यापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्याहून दर्यापूरकडे जाणारी कार क्र.एमएच-३० ए. जेड-७९७६ ने करतखेडा फाट्याजवळील यात्री शेडशी जोरदार टक्कर झाली. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत महेश गव्हाले रा. गीता नगर, अकोला व संतोष गोरड रा.हिंगणा म्हैसपूर यांचा मृत्यू झाला. कराचे चालक राहुल शिरकरे व चालक रोहित खड़से गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकरीता रवाना करण्यात आले. पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.