प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अकोला पंचायत समितीच्या आवारातून दुचाकी चोरीला जात आहेत. अशातच एका सदस्यासह कर्मचाऱ्याचे वाहन चोरीला गेले.

    अकोला (Akola).  अकोला पंचायत समितीच्या आवारातून दुचाकी चोरीला जात आहेत. अशातच एका सदस्यासह कर्मचाऱ्याचे वाहन चोरीला गेले. पंचायत समिती सदस्य भास्करराव अंभोरे यांची एमएच30-एएल-3884 क्रमांकाची एच. एफ. डिलक्स मोटारसायकल चोरीला गेली. त्यामुळे पंचायत समितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    वर्षभरात पं. स. च्या आवारातून चार ते पाच मोटारसायकली चोरीला गेल्या. पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिस चौकशी करण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप तक्रारदारांकडून होत आहे. पंचायत समितीच्या आवारात व बाहेर नेहमी वर्दळ असते. तरीही हॅण्डल लॉक असलेल्या दुचाकी लंपास केल्या जातात. अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही.

    पंचायत समिती आवारात सीसीटीव्ही नाही
    पंचायत समितीच्या आवारात एकच सुरक्षा रक्षक असतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. परंतु त्या बाबत अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. या भागातील सुरक्षा फळी मजबूत व्हावी तसेच वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा याकडेही लक्ष वेधले जात आहे.