ग्रामसभेला उपस्थित राहणार ग्रामस्थ; ग्रामविकास विभागाने दिले निर्देश

ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्वसामान्य ग्रामस्थांना यापुढे उपस्थित राहता येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिका-यांनी आता ग्रामस्थांना मासिक सभांना बसण्यास कोणी अडथळा आणू नये असा आदेश दिला आहे. तसेच यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत.

    अकोला (Akola).  ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना सर्वसामान्य ग्रामस्थांना यापुढे उपस्थित राहता येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिका-यांनी आता ग्रामस्थांना मासिक सभांना बसण्यास कोणी अडथळा आणू नये असा आदेश दिला आहे. तसेच यासंदर्भात उचित कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत.

    ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा म्हणून राज्य शासनाने 19 सप्टेंबर 1978 रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु ग्रामपंचायत सदस्य एकमताने ठराव मंजूर करून ग्रामस्थांना मासिक सभांना उपस्थित राहण्यास विरोध करीत होते. परंतु वारंवार पाठपुरावा केल्यामुळे पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी

    अधिकारी यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडेमार्गदर्शन मागविले होते. यावर कार्यासनअधिकारी सुहास जाधव यांनी 1 मार्च रोजी दिलेल्या पत्रात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना उपस्थित राहण्याबाबत तरतूद स्वयंस्पष्ट आहे असे कळविले आहे.