प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधी रोडवर आपल्या मालकीच्या आझाद कॉम्प्लेक्समध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आझाद खान अलियार खान, रा. जुने शहर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. दरम्यान, आरोपीचा वाहनचालक व एक नोकर फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अकोला(Akola): सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधी रोडवर आपल्या मालकीच्या आझाद कॉम्प्लेक्समध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आझाद खान अलियार खान, रा. जुने शहर याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. दरम्यान, आरोपीचा वाहनचालक व एक नोकर फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्समध्ये एक खासगी मेस चालविणारी महिला डबे घेऊन येते. आझाद खानने या महिलेचा अनेक दिवसांपासून पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलेने त्याला प्रतिसाद न दिल्याने आझाद खानने त्याचा चालक व एका नोकराला महिलेचा पाठलाग करण्यास सांगितले. चालक व नोकराने महिलेवर पाळत ठेवली; मात्र हा प्रकार महिलेच्या लक्षात आला.

महिलेने छळ असह्य झाल्याने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात आझाद खानसह त्याचा चालक व नोकराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आझाद खान, त्याचा चालक व नोकराविरुद्ध भादंविच्या कलम 354, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आझाद खानला अटकही झाली, परंतु न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.