ADAS Level 1 आणि Level 2 मधील फरक माहितीये? कार खरेदीपूर्वी जाणून घ्या!

Pradnya Nikam

ADAS म्हणजे काय?

ADAS म्हणजे Advanced Driver Assistance Systems. हे तंत्रज्ञान कॅमेरा, रडार आणि सेन्सर्सच्या मदतीने ड्रायव्हरला अपघात टाळण्यासाठी मदत करते.

Picture Credit:pinterest

ADAS Level 1 म्हणजे काय?

Level 1 मध्ये कारला एकावेळी एकाच प्रकारच्या ड्रायव्हिंग कामात मदत मिळते. उदाहरणार्थ, Adaptive Cruise Control किंवा Lane Keeping Assist.

Picture Credit:pinterest

Adaptive Cruise Control

या फीचरमुळे पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी कारचा वेग आपोआप कमी-जास्त होतो. मात्र, ड्रायव्हरचे लक्ष रस्त्यावर असणे आवश्यक आहे.

Picture Credit:pinterest

Lane Keeping Assist

कार लेनमधून बाहेर जात असल्यास हे फीचर स्टिअरिंगमध्ये हलका बदल करून कारला योग्य लेनमध्ये ठेवण्यास मदत करते.

Picture Credit:pinterest

ADAS Level 2 म्हणजे काय?

Level 2 मध्ये कार एकाच वेळी वेग आणि स्टिअरिंग या दोन्ही गोष्टी नियंत्रित करू शकते. त्यामुळे ड्रायव्हिंगमध्ये अधिक मदत मिळते.

Picture Credit:pinterest

Level 2 मध्ये कोणते फीचर्स?

Adaptive Cruise Control आणि Lane Centering Assist यांसारखी फीचर्स एकत्र काम करतात. त्यामुळे कार पुढील वाहनापासून अंतर राखत लेनच्या मध्यभागी राहण्यास मदत करते.

Picture Credit:pinterest

दोन्हींमध्ये नेमका फरक काय?

Level 1 मध्ये एकावेळी एक ड्रायव्हिंग असिस्ट फीचर काम करते, तर Level 2 मध्ये वेग आणि स्टिअरिंगचे नियंत्रण एकत्रितपणे केले जाते.

Picture Credit:pinterest

कोणते तंत्रज्ञान अधिक सुरक्षित?

Level 2 मध्ये दोन्ही प्रकारचे नियंत्रण एकत्र मिळत असल्याने ड्रायव्हरला अधिक मदत मिळते. मात्र, त्याची सुरक्षितता सेन्सर्स, सॉफ्टवेअर आणि रस्त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.

Picture Credit:pinterest

ड्रायव्हरची जबाबदारी संपते का?

नाही! Level 1 आणि Level 2 या दोन्हीमध्ये ड्रायव्हरने सतत रस्त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. Level 2 ही सेल्फ ड्रायव्हिंग कार नाही. गरज पडल्यास वाहनाचे नियंत्रण त्वरित स्वतःकडे घ्यावे लागते.

Picture Credit:pinterest

पुढे वाचा

GTA 6 मधील बाईक्सचा लूक आवडतो? मग या 5 मोटरसायकल्स पाहाच!