Amba Ghat Kolhapur: ढगांशी गप्पा मारायच्या आहेत? महाराष्ट्रातील या घाटाचं सौंदर्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध

Riddhi Vanne

कोल्हापूरमधला आंबा घाट म्हणजे ढगांनी वेढलेले डोंगर, हिरवीगार झाडी आणि वळणावळणाचे रस्ते असलेलं एकदम भारी ठिकाण आहे.

हा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यावर सह्याद्रीच्या डोंगरात वसला आहे.

पावसाळ्यात इथे डोंगरावरून ढग उतरतात आणि जागोजागी छोटे-मोठे धबधबे वाहायला लागतात.

इथे आल्यावर जवळच पावनखिंड आणि विशाळगड किल्ला पण बघता येतो.

इथे आल्यावर जवळच पावनखिंड आणि विशाळगड किल्ला पण बघता येतो.

कोल्हापूरहून एसटी बसने किंवा स्वतःच्या गाडीने रत्नागिरी रस्त्याने इथे सहज पोहोचता येतं.

पण पावसाळ्यात जाताना धुकं, घसरडा रस्ता आणि वळणं यामुळे गाडी जरा सावकाशच चालवा.