काय सांगताय? आता WhatsApp वर मेसेज शेड्यूल करता येणार? ठरलेल्या वेळी मेसेज पाठवणारे फीचर?

Pradnya Nikam

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार!

वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचा मेसेज; आता आधीच लिहून ठेवा आणि ठरलेल्या वेळी पाठवा!

WhatsApp | Pinterest

काय आहे Scheduled Message फीचर?

WhatsApp चे हे नवीन फीचर मेसेज पाठवण्याची वेळ आधीच ठरवण्याची सुविधा देते. मेसेज लिहून तारीख आणि वेळ निवडली की तो योग्य वेळी आपोआप पाठवला जातो.

WhatsApp | Pinterest

किती दिवस आधी मेसेज शेड्यूल करता येईल?

WhatsApp वर मेसेज किमान 10 मिनिटांनंतर आणि जास्तीत जास्त 14 दिवसांपर्यंत शेड्यूल करता येऊ शकतो. त्यामुळे वाढदिवस किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आधीच मेसेज तयार ठेवता येतो.

WhatsApp | Pinterest

कसे शेड्यूल करायचे WhatsApp मेसेज?

सर्वप्रथम संबंधित व्यक्तीची किंवा ग्रुपची चॅट उघडा. मेसेज टाइप करा आणि Send बटण दाबून ठेवा. त्यानंतर तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल.

WhatsApp | Pinterest

तारीख आणि वेळ निवडा, मेसेज होईल तयार!

मेसेज कोणत्या दिवशी आणि किती वाजता पाठवायचा ते निवडा. वेळ निश्चित केल्यानंतर शेड्यूल कन्फर्म करा. आता मेसेज निवडलेल्या वेळेपर्यंत प्रतीक्षेत राहील.

WhatsApp | Pinterest

फोन बंद असला तरी मेसेज जाणार!

WhatsApp च्या माहितीनुसार, मेसेज शेड्यूल केल्यानंतर फोन बंद असला किंवा बॅटरी संपली तरी तो ठरलेल्या वेळी पाठवला जाऊ शकतो. त्यामुळे फोन सुरू ठेवण्याची गरज नाही.

WhatsApp | Pinterest

फक्त टेक्स्ट नाही, फोटो आणि व्हिडिओही!

Scheduled Messages फीचरमध्ये टेक्स्टसोबत फोटो आणि व्हिडिओही शेड्यूल करता येतात. त्यामुळे शुभेच्छा, आठवणी किंवा महत्त्वाची माहिती योग्य वेळी पाठवणे अधिक सोपे होईल.

WhatsApp | Pinterest

शेड्यूल केलेला मेसेज पाहता आणि डिलीट करता येईल?

होय! भविष्यात पाठवण्यासाठी ठेवलेले मेसेज पाहता येतील. मेसेज पाठवण्यापूर्वी तो डिलीट करण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे प्लॅन बदलल्यास मेसेज रद्द करता येतो.

WhatsApp | Pinterest

Android आणि iPhone वर मिळणार फीचर!

WhatsApp हे फीचर जगभरातील Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करत आहे. तुमच्या फोनमध्ये हा पर्याय दिसत नसल्यास WhatsApp अपडेट करा आणि रोलआउटची प्रतीक्षा करा.

WhatsApp | Pinterest