हिवाळ्यात घरातील हवा कोरडी होते? हे गॅझेट ठरेल उपयोगी!

Pradnya Nikam

Smart Humidifier

काय आहे हे गॅझेट?

हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला Smart Humidifier म्हणजेच स्मार्ट ह्युमिडिफायर म्हणतात.

Smart Humidifier

कसे करते काम?

या उपकरणातील पाण्याच्या टाकीतून अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन किंवा इतर तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत सूक्ष्म पाण्याचे कण सोडले जातात.

Smart Humidifier

हवेतील आर्द्रता नियंत्रित!

स्मार्ट ह्युमिडिफायरमधील सेन्सर खोलीतील आर्द्रता मोजतो आणि ठरवलेल्या पातळीनुसार उपकरणाचे काम नियंत्रित करू शकतो.

Smart Humidifier

मोबाईलवरूनही करता येते कंट्रोल!

काही स्मार्ट मॉडेल्समध्ये Wi-Fi किंवा Bluetooth कनेक्टिव्हिटी असते, त्यामुळे मोबाईल अ‍ॅपवरून आर्द्रतेची पातळी आणि उपकरणाची सेटिंग नियंत्रित करता येते.

Smart Humidifier

त्वचा आणि घशाच्या कोरडेपणापासून आराम!

खोलीतील योग्य आर्द्रता राखल्यास कोरडी त्वचा, नाक आणि घशातील कोरडेपणामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.

Smart Humidifier

किती आर्द्रता असावी?

घरातील सापेक्ष आर्द्रता साधारण ३० ते ५० टक्क्यांदरम्यान ठेवणे योग्य मानले जाते, त्यामुळे ह्युमिडिफायरमध्ये ह्युमिडिटी सेटिंग उपयोगी ठरते.

Smart Humidifier

प्रत्येक ह्युमिडिफायर स्मार्ट असतो का?

नाही! साध्या ह्युमिडिफायरमध्ये आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट सेन्सर किंवा मोबाईल कनेक्टिव्हिटी असेलच असे नाही.

Smart Humidifier

वापरताना ही काळजी घ्या!

ह्युमिडिफायरची टाकी नियमित स्वच्छ करा, पाणी वेळेवर बदला आणि खोलीतील आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्या.

Smart Humidifier