कानातले Earbuds आता तुमचे बोलणे लिहून देणार! AI चे भन्नाट फीचर

Pradnya Nikam

कानातले Earbuds आता तुमचे बोलणे लिहून देणार!

गाणी ऐकण्यासाठी वापरले जाणारे Earbuds आता AI च्या मदतीने तुमचे बोलणे टेक्स्टमध्ये बदलू शकतात. मीटिंग असो किंवा महत्त्वाची चर्चा, नोट्स काढण्याचे काम होणार सोपे!

AI Earbuds | Pinterest

AI Earbuds म्हणजे काय?

हे खास Earbuds आवाज रेकॉर्ड करून AI च्या मदतीने त्याचे लिखित स्वरूप तयार करतात. काही मॉडेल्समध्ये बोलण्याचा सारांश आणि महत्त्वाचे मुद्देही मिळतात.

AI Earbuds | Pinterest

तुमचे बोलणे टेक्स्टमध्ये कसे बदलते?

Earbuds मधील मायक्रोफोन आवाज टिपतो. त्यानंतर संबंधित अॅप किंवा AI सॉफ्टवेअर आवाजाचे विश्लेषण करून शब्दांचे टेक्स्टमध्ये रूपांतर करते. ही प्रक्रिया Speech-to-Text म्हणून ओळखली जाते.

AI Earbuds | Pinterest

मीटिंगमधील महत्त्वाचे मुद्दे राहणार नाहीत विसरून!

ऑफिसमधील मीटिंग रेकॉर्ड करून तिचे लिखित स्वरूप मिळवता येते. काही AI Earbuds चर्चेचा सारांश, महत्त्वाचे मुद्दे आणि पुढील कामांची यादीही तयार करतात.

AI Earbuds | Pinterest

लेक्चर ऐका आणि नोट्सही मिळवा!

विद्यार्थ्यांना लेक्चरमधील माहिती पुन्हा वाचण्यासाठी टेक्स्ट स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे महत्त्वाचे मुद्दे शोधणे आणि अभ्यासाची उजळणी करणे सोपे होऊ शकते.

AI Earbuds | Pinterest

अनेक भाषांमध्ये बोलणे ओळखण्याची क्षमता

काही AI Earbuds अनेक भाषांमधील आवाज ओळखू शकतात. काही मॉडेल्समध्ये भाषांतराची सुविधाही मिळते. मात्र मराठीसह कोणत्या भाषा समर्थित आहेत, हे मॉडेलनुसार तपासणे गरजेचे आहे.

AI Earbuds | Pinterest

AI नोट्स देणारे Earbuds कोणते?

POVA AI Buds Pro, viaim RecDot आणि iKKO ActiveBuds यांसारख्या डिव्हाइसमध्ये AI रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन किंवा नोट्स तयार करण्याची सुविधा दिली जाते.

AI Earbuds | Pinterest

गाणी, कॉल्स आणि AI नोट्स एकाच डिव्हाइसमध्ये!

सामान्य Earbuds प्रामुख्याने संगीत आणि कॉल्ससाठी वापरले जातात. AI फीचर असलेले काही Earbuds आवाजाचे टेक्स्ट, सारांश आणि कामांची यादी तयार करू शकतात. त्यामुळे ते कामासाठीही उपयोगी ठरतात.

AI Earbuds | Pinterest

रेकॉर्डिंग करण्यापूर्वी ही काळजी घ्या!

प्रत्येक Earbud मध्ये हे फीचर नसते. काहींना स्मार्टफोन अॅप किंवा इंटरनेटची गरज असते. तसेच कोणाचे बोलणे रेकॉर्ड करण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आणि गोपनीयतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

AI Earbuds | Pinterest