Electric Kettle Auto Cut-Off – पाणी उकळल्यावर केटल आपोआप बंद कशी होते?

Pradnya Nikam

Auto Cut-Off म्हणजे काय?

इलेक्ट्रिक केटलमध्ये Auto Cut-Off हे खास सेफ्टी फिचर असते. पाणी उकळल्यानंतर हे फिचर वीजपुरवठा आपोआप बंद करते.

pinterest

केटलमध्ये असते खास यंत्रणा

केटलच्या हँडलजवळ किंवा बेसमध्ये थर्मोस्टॅट आणि स्विचशी जोडलेली यंत्रणा असते. ही यंत्रणा पाण्याच्या उकळीवर लक्ष ठेवते.

pinterest

वाफेची असते महत्त्वाची भूमिका

पाणी उकळायला लागल्यावर त्यातून वाफ तयार होते. ही वाफ केटलमधील खास स्टीम चॅनेलमधून थर्मोस्टॅटपर्यंत पोहोचते.

pinterest

तापमानामुळे होते बदल

वाफेच्या उष्णतेमुळे बायमेटॅलिक स्ट्रिप किंवा थर्मोस्टॅटमधील घटक गरम होतात. ठरावीक तापमान गाठल्यावर त्यांची स्थिती बदलते.

pinterest

स्विच होतो आपोआप बंद

थर्मोस्टॅट सक्रिय होताच केटलचा इलेक्ट्रिकल स्विच ट्रिप होतो. त्यामुळे हीटिंग एलिमेंटचा वीजपुरवठा खंडित होतो.

pinterest

पाणी नसतानाही मिळते सुरक्षा

अनेक इलेक्ट्रिक केटलमध्ये Boil-Dry Protection देखील असते. केटलमध्ये पाणी नसताना ती सुरू राहिल्यास ही यंत्रणा अतिउष्णता ओळखून वीजपुरवठा बंद करू शकते.

pinterest

Auto Cut-Off असूनही काळजी घ्या!

केटलमध्ये आवश्यक तेवढेच पाणी भरा. ती सुरू असताना झाकण उघडू नका. तसेच केटलमधील पाणी पूर्ण संपेपर्यंत ती चालू ठेवू नका.

pinterest

स्मार्ट टेक्नॉलॉजीचा छोटा नमुना!

एका छोट्याशा थर्मोस्टॅटमुळे केटल पाणी उकळल्यावर आपोआप बंद होते. यामुळे वीज वाचण्यास आणि अनावश्यक गरम होणे टाळण्यास मदत होते.

pinterest