Pradnya Nikam
Smartwatch मध्ये Heart Health Score म्हणजे काय?
स्मार्टवॉचमध्ये आता केवळ Heart Rate नाही, तर Heart Health Score सारखे फीचर्सही दिसतात. हा स्कोअर हृदयाशी संबंधित काही आरोग्यविषयक मेट्रिक्सचा एकत्रित अंदाज देतो.
हृदयाच्या आरोग्याचा एकत्रित अंदाज
Heart Health Score हा काही स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध असलेला डिजिटल इंडिकेटर आहे. तो हृदयाशी संबंधित मोजमाप आणि शरीराच्या हालचालींच्या डेटावर आधारित तयार केला जाऊ शकतो.
Heart Rate पासून HRV पर्यंत अनेक मेट्रिक्स
डिव्हाइसच्या फीचर्सनुसार Heart Rate, Resting Heart Rate, Heart Rate Variability (HRV), शारीरिक हालचाल आणि व्यायामाची माहिती स्कोअर तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
हृदय एका मिनिटात किती वेळा धडधडते?
Heart Rate म्हणजे एका मिनिटात हृदयाचे ठोके किती वेळा पडतात. स्मार्टवॉचच्या मागील बाजूचे Optical Sensor त्वचेतील रक्तप्रवाहातील बदल टिपून Pulse Rate चा अंदाज घेतात.
हृदयाच्या ठोक्यांमधील अंतरातील बदल
HRV म्हणजे Heart Rate Variability. हृदयाच्या सलग ठोक्यांमधील वेळेत होणारा बदल याला HRV म्हणतात. काही स्मार्टवॉच हा डेटा शरीराचा ताण आणि Recovery समजून घेण्यासाठी वापरतात.
स्मार्टवॉचचा Algorithm करतो डेटाचे विश्लेषण
स्मार्टवॉच विविध Sensors मधून मिळालेला डेटा आपल्या Software Algorithm द्वारे तपासते. त्यानंतर काही डिव्हाइसमध्ये एकत्रित स्कोअर किंवा Health Indicator दाखवला जातो. प्रत्येक ब्रँडची गणना वेगळी असू शकते.
स्कोअर चांगला दिसला म्हणजे हृदय पूर्णपणे निरोगी?
असे नाही! काही स्मार्टवॉचमध्ये जास्त स्कोअर हा त्या डिव्हाइसच्या मोजमापानुसार चांगला संकेत असू शकतो. मात्र, प्रत्येक ब्रँडचा स्कोअर आणि त्याचा अर्थ वेगळा असतो.
Smartwatch चा स्कोअर मेडिकल टेस्टचा पर्याय नाही
स्मार्टवॉचमधील मोजमापांवर हालचाल, घड्याळाचा फिट आणि Sensor चा संपर्क यांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे Heart Health Score हा आरोग्याचा अंदाज समजावा; वैद्यकीय निदान नाही.
Heart Health Score कडे लक्ष द्या, पण योग्य अर्थ समजून!
स्मार्टवॉचचा Heart Health Score रोजच्या आरोग्यविषयक ट्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. मात्र, स्कोअर असामान्य दिसत असेल किंवा त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.